– सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणेश स्थापन करणाऱ्यांचा नगर परिषदेतर्फे होणार गौरव
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १८ सप्टेंबर : माझी वसुंधरा अभियान ४.० तथा स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत देसाईगंज नगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी खास सार्वजनिक मंडळ व घरगुती गणेशांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. स्वच्छता, प्लास्टिकमुक्त तसेच विविध सामाजिक उपक्रमांसह उत्सव साजरा करणाऱ्या तीन मंडळांना ५ हजार ते ११ हजार रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके दिले जाणार आहेत.
शहरातील सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक उत्सव व्हावा, यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जातात. शाडू किंवा मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा, निर्माल्यासाठी कापड़ी पिशवी किंवा निर्माल्य कलशाचा वापर टाळणाऱ्या सजावटीसाठी कागदी मखराचा वापर करणाऱ्या, प्लॉस्टिक किंवा थर्माकोलचा वापर न करणान्या, मंडपाची जागा रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणाऱ्या, ध्वनिप्रदूषण टाळणाऱ्या, शांतता व सलोखा राखणाऱ्या सार्वजनिक मंडळांना बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांनी सांगितले.
सार्वजनीक गणेश उत्सवाकरीता प्रथम क्रमांकाच्या मंडळास रोख रुपये ११ हजार, द्वितीय क्रमांकासाठी रुपये ७ हजार ५०० रुपये तर तृतीय क्रमांकाच्या मंडळाला रुपये ५ हजार रुपये पारितोषिक जाहीर केले आहे. तर घरगुती गणेश उत्सवाकरीता पर्यावरण पुरक निकष पाळणाऱ्यांना प्रथम क्रमांक रोख रुपये १० हजार, द्वितीय क्रमांकासाठी रुपये ७ हजार तर तृतीय क्रमांकाच्या मंडळाला रुपये ३ हजार रुपये पारितोषिक जाहीर केले आहे. यासाठी पालिकेचा चमू सर्व मंडळांना भेटी देऊन उत्कृष्ट मंडळ व घरगूती गणेशांची निवड करणार आहे.
याशिवाय घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेतर्फे कृत्रिम तलावाची निर्मीती तयार करण्यात आलेली असुन, स्थानिक हूतात्मा स्मारक परिसर व विर्शी तुकूम शाळा परिसराची निवड करण्यात आल्याचे मुख्यधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांनी सांगीतले असुन या कृत्रीम तलावात घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात यावे असे आवाहन केले आहे.