-ग्रामस्थांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : अहेरी तालुक्यातील टेकमपल्ली येथे मागील ७ वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद असून गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. आपल्या गावाच्या कार्यातून इतरही गावातील लोकांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने ग्रामस्थांनी दारुबंदीचा विजय उत्सव साजरा करीत मुख्य चौकात विजयस्तंभ उभारला.
टेकमपल्ली या गावात ई. स २०१७ पूर्वी अवैध दारूविक्री सुरु असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे गावाने दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन गावाला दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त केले. आता जवळपास सात वर्षांपासून गावात दारूबंदी लागू आहे. यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करून आपल्या गावातून अवैध दारू हद्दपार केली. गावात दारूविक्री बंदी असल्याने गावामध्ये सुख-शांती नांदत आहे. विविध उपक्रम अतिशय शांततेत पार पाडले जातात. दारूबंदीमुळे गावातली तंटे कमी झाली. आमच्या गावाची प्रेरणा इतर गावांना मिळावी, या हेतुने गावातील लोकांनी लोक वर्गणी व श्रमदानाच्या माध्यमातून गावाच्या मुख्य ठिकाणी विजयस्तंभ बोर्डाचे आधुनिक परंपरेनुसार पूजन करून उदघाटन केले.
यावेळी गाव पाटील भीमराव सिडाम, विश्वनाथ आलाम, बाबुराव मडावी, लक्ष्मण कुमरे, नितेश करपे, ज्ञानेश्वर सिडाम, अशोक सिडाम, सरिता आलाम, मनीषा सिडाम, विमल गेडाम, विमल कोडापे, पुष्पा नैताम व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकर, मुक्तीपथ कार्यकर्ता भूषण गौरी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #muktipath #gadchirolinews )