धानोरा येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी

273

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ सप्टेंबर : स्थानिक पोलीस स्टेशन मुख्यालयात एमटी पार्क मध्ये भगवान विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात १७ सप्टेंबर रोजी ११३ बटालियन केंद्रीय रिझर्व पोलीस बल च्या वतीने साजरी करण्यात आली.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने विश्वकर्मा यांच्या जन्म दिवसाच्या निमित्याने मंदिर परिसरात भजन कीर्तन व पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ११३ बटालियनचे कमांन्डेट जसविरसिंग यांनी मंदिरात उपस्थित बटालियन अधिकारी आणि जवानांना भगवान विश्वकर्मा यांच्या जीवनावर बद्दल प्रकाश टाकला आणि मंदिरात प्रसाद व प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. या शुभप्रसंगी बटालियनचे अधिकारी जवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here