केंद्र संचालकाच्या व्हिडीओ व्हायरल प्रकरणी होणार चौकशी : कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

184

– त्या केंद्रसंचालकास पदावरून केले मुक्त
The गडविश्व
गडचिरोली, ०९ मार्च : बारावीच्या परीक्षेदरम्यान कुरखेडा येथील परीक्षा केंद्र ६२७ मधील केंद्र संचालकाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणाचे गांभीर्य विचारात घेवून गटशिक्षणाधिकारी तथा तालुका परीरक्षक सी. ए. पुराणिक यांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून सदर चौकशीच्या अहवाल व सचिव, विभागीय मंडळ नागपुर यांनी केलेल्या सूचनेनुसार तात्काळ किशोर अंबरदास कोल्हे यांचे केंद्रसंचालक पदावरून पदमुक्त करून त्याऐवजी कालीदास पुंडलीक सोरते (उच्च माध्यमिक शिक्षक) यांची नियुक्ती केंद्र संचालक म्हणून करण्यात आली आहे. तसेच सदर गैरप्रकाराची तक्रार प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाणे कुरखेडा येथे दाखल करण्यात आली आहे.
कुरखेडा येथील इयत्ता १२ च्या ६२७ परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकाचा कॉपी करू देण्यास पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गंभीर प्रकाराबाबत चौकशी करण्याचे विभागीय सचिव यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आदेश दिले आहेत. इयत्ता १० वी १२ वी च्या परीक्षा संबंधाने कोणताही गैरप्रकार झाल्यास दोषी विरुध्द नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल असे निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा सदस्य सचिव जिल्हा दक्षता समिती गडचिरोली आर. पी. निकम यांनी दिले आहे.

(The gadvishva) (Gadchiroli kurkheda news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here