The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : तालुक्यातील केंद्र मुरुमगाव पंचायत समिती धानोरा अतंर्गत पन्नेमारा येथे मंगळावर १० डिसेंबर २०२४ रोजी केन्द्र स्तरीय शालेय बाल क्रिडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे उद्घाटन सरपंच शेवंताताई हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.लताताई पुगांटे तर प्रमुख उपस्थितीती म्हणून माजी पंचायत समिती सभापती अजमन मायाराम राऊत, सरपंच शिवप्रसाद गवरणा ग्रामपंचायत मुरुमगाव, उप सरपंच प्रकाश हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समीती करनसाय हलामी, उपसरपंच मथनूराम मलीया ग्रामपंचायत मुरुमगाव, ग्राम सेवक सौ. किलनाके ग्रामपंचायत पन्नेमारा, हिरामण हलामी पन्नेमारा, मनिराम रावटे कूलभटटी, मूरारीजी हलामी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मरारटोला, शरीफ भाई कूरेशी, तुकाराम कोल्हे पन्नेमारा,मनोहरसिहं परिहार पन्नेमारा, मुकेश पूडो ग्रामपंचायत सदस्य पन्नेमारा, ग्रामपंचायत सदस्य सूमिता हलामी, ग्रामपंचायत सदस्य माधूरी हलामी, ग्रामपंचायत सदस्य अनिता मडावी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाताई नरोटे, संतोषी हलामी, सुशीला हलामी, बिदां टेकाम, कुंतीबाई तूलावी, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला खेळाडूचे एकत्रीकरण करून पाहुण्यांचे आगमन व ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पंचांना शपथ देवून मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले .
या क्रिडा संमेलनात एकूण १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यात जि.प शाळा मरारटोला, जि.प. शाळा केहकावाही, जि.प. शाळा चारवाही, जि.प. शाळा बोदनखेडा, जि.प. शाळा बेलगाव, जि.प. शाळा गूररेकसा, जि.प. शाळा तूमडीकसा, जि.प. शाळा हिरंगे, जि.प. शाळा पन्नेमारा, जि.प. शाळा कटेझरी, जि.प. शाळा रिङवाही, जि.प. शाळा उमरपाल, जि.प. शाळा कूलभटी, जि.प. शाळा फूलकोडो, जि.प. शाळा खेडेगाव, जि.प. शाळा रामपूर, जि.प. शाळा मुरुमगाव, जि.प. शाळा लहान झलिया या शाळांनी सहभाग घेतला. या क्रिडा संमेलनाचे संयोजक अरूण सातपुते केन्द्र प्रमुख मुरुमगाव व या कार्यक्रमाचे संचालन खेवले, अमूल्य यांनी तर आभार मूनघाटे सर यांनी केला.