गुरवळाच्या जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेच्या सभापतीपदी शेकापचे लंकेश गेडाम बिनविरोध

193

– जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेची निवडणूक संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, ३१ जानेवारी : तालुक्यातील गुरवळा येथील जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते लंकेश वामनराव गेडाम यांची संस्थेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सुरेश किसन भोयर, रमेश गोसाई गेडाम, पत्रूजी बोंडकूजी मेश्राम, भगवान भाऊराव गेडाम, जितेंद्र माधव शेंडे, डंबाजी जोगूजी मेश्राम, रविंद्र आडकूजी मानकर, सुधीर मनोहर मेश्राम, रेखा नरेंद्र गेडाम, पोर्णिमा पुरुषोत्तम शेंडे यांची संचालक म्हणून वर्णी लागली आहे.
जयभारत मच्छिमार सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, जयश्री वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे, गंगाधर बोमनवार, तुकाराम गेडाम, हेमंत डोर्लीकर, कैलास शर्मा, चंद्रकांत भोयर, विनोद मेश्राम, देवेंद्र भोयर, तितीक्षा डोईजड, शेकापच्या गुरवळा शाखेचे चिटणीस विलास अडेंगवार, खजिनदार माणिक गावळे, सहचिटणीस प्रदिप मेश्राम, गजानन अडेंगवार, चंपतराव मेश्राम यांचेसह अनेकांनी सभापती लंकेश गेडाम आणि संचालकांचे अभिनंदन केले आहे.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Andhra Pradesh Capital) (Economic Survey 2023) (February) (Priyanka Chopra) (Joao Cancelo) (The Last of Us) (Chairman of Gurwalachya Jayabharat Fishermen’s Co-operative Society Shekapche Lankesh Gedam unopposed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here