– जिल्ह्यात वाघांचे मृत्युसत्र सुरूच
The गडविश्व
चंद्रपूर, २५ मार्च : जिल्ह्यात वाघांचे मृत्युसत्र सुरूच असून जिल्ह्यातील धाबा वनपरिक्षेत्रांतर्गत सुकवाशी डोंगरगाव जंगलात वाघीण आणि बछड्यासह एका वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील धाबा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६१ मध्ये शुक्रवार २४ मार्च रोजी एका बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर वन विभागाने शनिवारी २५ मार्च रोजी शोध मोहिम हाती घेतली असता, कक्ष क्रमांक १६३ मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून बछडा व वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला आहे. वाघीण आणि बछड्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तर या वाघिणीचे अन्य काही बछडे होते का? याचा शोध वनविभाग घेत आहे.
(The gadvishva) (gadchiroli chandrapur news updates) (Tiger death)