– रुग्णालयात सुरू होते उपचार
The गडविश्व
चंद्रपूर, ३० मे : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा आज ३० मे रोजी पहाटे नवी दिल्ली येथे रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची सुद्धा प्रकृती खालावली होती. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र आज ३० मे रोजी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघात काँग्रेसतर्फे विजय मिळवला होता. महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते.
त्यांचे पार्थिव दिल्लीतून नागपूर मार्गे वरोरा येथे दुपारी दीड वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असल्याचे कळते. त्यानंतर उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती आहे. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अशा एकाएकी जाण्याने मात्र शोककळा पसरली आहे.
(the gdv, the gadvishva, chandrpur, MP Balu Dhanorkar)
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांचे कुटुंबीय, सहकारी व कार्यकर्त्यांना मिळो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!#baludhanorkar #Chandrapur pic.twitter.com/yk49oBhldK
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 30, 2023