The गडविश्व
भद्रावती, दि. १४ : तालुक्यातील गट ग्रामपंचायत भामडेळी येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील वृद्ध आणि अपंग नागरिकांना उपयोगी अशा लोखंडी आलमारी व पाणी कॅनचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ. सुषमा अमोल जिवतोडे, उपसरपंच शामल ननावरे, सदस्य शीतल दाभेकर, विजय भोपरे, सुषमा ढोक, माधुरी तोडसे, मंगेश कोवे यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विनोद घरत, ईश्वर घोडमारे, सुधीर भोयर यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमातून सामाजिक समतेचा संदेश देत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bhadrvati #bhamdheri #chandrpurnews #14april #drbabasahebambedkarjayanti