प्रशासन आपल्या दारी अंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांची कुरखेडा गावाला भेट

79

– नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०१ : तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कुरखेडा गावात ७ डिसेंबर रोजी वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले होते त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी गावांतील नागरिक वन परिक्षेत्र कार्यालयात येणार असल्याची सूचना क्षेत्र सहाय्यक परशुराम मोहरले यांना माहिती झाल्यावर लगेच ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांना सांगितल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले असता प्रशासन च आपले प्रश्न ऐकण्यासाठी आपल्या गावात येणार आहे असा निरोप गावातील लोकांना देण्यात आला. त्यानुसार चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी क्षेत्रं सहाय्यक चातगाव व अधिनिस्त वनरक्षक व पी आर टी टीम चे सर्व जण कुरखेडा गावात पोहोचले. यावेळी गावातील नागरिकांना प्रशासन आपल्या दारी याचा अनुभव आला. गावात सर्व नागरिक जमलेले होते. जे एफ एम समिति चे अध्यक्ष व पदाधिकारी सुद्धा सुद्धा हजर होते. या सर्वांनी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी
केली असता वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गावातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करा ही मागणी तसेच कुरखेडा ते कुडकवही रस्ता, कुरखेडा ते सावरगाव रस्ता व सावरगाव ते जूनापुर पॅच या रस्त्याच्या दुतर्फा चैन लिंक किंवा बारबेट वायर फेंसिंग करण्याची मागणी केली तर काही नागरिकांनी एल पी जी गॅस ची मागणी केली तसेच आज पासून कुरखेडा वरून शाळेत जाणाऱ्या मुलांना पी आर टी टीम सोबत राहून सोडून देत आहे तसेच गस्ती वाहन चा सुद्धा उपयोग उदया पासून करण्यात येईल असे चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.
गावात मुलांना शाळेत जाणे येण्यासाठी बस ची व्यवस्था करणे बाबतीत सुद्धा त्यानी गावकऱ्यांना आश्वस्त केले. प्रशासनच आपल्या दारी समाधान व्यक्त व्यक्त करून आमच्या समस्या सोडवतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. कामाचा पाठपुरावा समिति मार्फत सुद्धा करण्यात येईल असे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी नागरिकांना दिली. यावेळी सुनील व्हि. सोनटक्के, वनपरिक्षेत्र अधिकारी चातगाव, परशुराम डी. मोहुले क्षेत्र सहायक चातगाव, गणेश धंदरे वनरक्षक बामणी, संजू टेंभूर्णीकर वनरक्षक उ. जांभळी, वनीता सहारे वनरक्षक सावरगाव, विठ्ठल मेश्राम वनरक्षक चातगाव हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here