– जिल्हा सदस्य समिती गठीत
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.१४ : पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या गडचिरोली जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्यपदी चेतन गहाणे यांच्यासह पाच जणांची निवड करण्यात आली आहे.
राज्यभरात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने देशभरात शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे राज्यप्रमुख तथा व्हॉईस ऑफ मीडिया राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांच्या सुचणेनुसार व्हॉईस ऑफ मीडियाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुड्डमवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात बारा तालुका निहाय शैक्षणिक विभागाचे काम करण्यासाठी तालुक्याकरीता प्रत्येकी एक या प्रमाणे बारा जणांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये चेतन गहाणे कुरखेडा यांच्या सोबत श्रीकांत पतरंगे- गडचिरोली, हेमंत उपाध्ये- चामोर्शी, मो. शरीफ कुरेशी- धानोरा, आनंद विश्वास- एटापल्ली अनिल गुरनोले- अहेरी, रूमदेव सहारे- आरमोरी, विस्तारी गंगाधरीवर- मूलचेरा, कोसर खान रशीद खान- सिरोंचा, गोविंद चक्रवर्ती- भामरागड, विलास ढोरे- देसाईगंज, लिकेश अंबादे- कोरची ₹यांची तालुका निहाय पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.