फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

116

The गडविश्व
गडचिरोली, २७ जून : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित फुले – आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे 26 जून 2023 रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खंगार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. यादव गहाणे, प्रा. प्रज्ञा वनमाळी प्रा. डॉ. विवेक गोर्लावार,प्रा. डॉ. अभय लाकडे, प्रा. डॉ. रूपेंद्र गौर, प्रा. विनोद कुकडे, प्रा. अजय निंबाळकर, प्रा. सरिता बुटले, प्रा. दिलीप बरसगडे, प्रा. कविता उईक, प्रा. सुरेश कंती, प्रा. हितेश चरडे प्रा. दीपक तायडे, सुधाकर इंगुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ. वर्षा तिडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप बैस यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here