रांगी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण शिबिर संपन्न

181

– ३३३ महिलांचे अर्ज दाखल
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २३ : तालुक्यातील रांगी येथील ग्रामपंचायत सभागृहात २२ जुलै २०२४ ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे एका दिवसाचे शिबिर सरपंचा सौ.फालेश्वरीताई प्रदिप गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये ४५ अर्ज भरण्यात आले आतापर्यंत एकूण ३३३ अर्ज भरण्यात आले आहे.
रांगी परिसरातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना मार्गदर्शन करून आँफलाईन आणि आँनलाईन फार्म कसे भरायचे, कोणकोणते कागदपत्रे जोडायचे या बाबत सविस्तर मार्गदर्शन चिमुरकर सुपरवायझर पंचायत समिती धानोरा यांनी केले.
सदर शिबिराला पंचायत समिती धानोरा अंतर्गत अतिरिक्त बिडिओ एम. ए .कोमलवार, हेमके सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती धानोरा, शिबिरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात ४५ अर्ज भरण्यात आले. तर आता पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत ऑनलाइन १८६ व ऑफलाईन १४७ अर्ज असे एकूण ३३३ अर्ज भरून घेण्यात आले.
सभेला रांगी ग्रामपंचायतचे सचिव बांबोळे, निमनवाडा गट- ग्रामपंचायत सचिव मुळे, ग्रामविकास अधिकारी राऊत, शंभरकर शाखाधिकारी रांगी, ग्रामपंचायत रांगीचे उपसरपंच नुरज हलामी, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत साळवे, दिनेश चापडे, राकेश कोराम, अर्चनाताई मेश्राम, विद्याताई कपाट, शशिकलाताई मडावी आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच रोजगार सेवक आणि अंगणवाडी सेविका उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here