सोनसरी येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रम उत्साहात साजरा

156

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. २१ : शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील पटांगणावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कुरखेडा तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार ओमकार पवार (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे महिलांमार्फत करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी तसेच सत्कारमूर्तीमध्ये देखील संपूर्ण महिलांचा सहभाग होता. अश्या प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम राबवून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या ओमकार पवार यांनी तालुक्यातील समाजासमोर एक आदर्श स्थापित केला आणि महिलांमधील आत्मविश्वासाला या उपक्रमामुळे चालना मिळाली आहे.
आजपर्यंत आयोजीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिरांच्या माध्यमातून तालुक्यातील २५००० महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथाचे स्वागत सुद्धा यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आले सोबतच आरोग्य विभागामार्फत निशुल्क टी.बी, सिकल सेल व सामान्य आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महिला सरपंच, उमेदच्या महिला सदस्या, आदर्श विद्यार्थिनी आणि विविध शासकीय विभागांच्या महिला अधिकारी / कर्मचारी उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला धीरज पाटील (संवर्ग विकास अधिकारी), गणेश कुकडे (महिला व बाल विकास अधिकारी), नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, निखील पाटील, सत्यनारायण अनमदवार, संजय रामटेके ( तालुका कृषी अधिकारी) यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here