मुरुमगाव येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळावा संपन्न

199

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०१ : तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेल ग्रामपंचायत मुरुमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या पटांगणात शनिवार ३० डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तालूका अध्यक्ष भाजपा सौ.लताताई पूगांटे तर अध्यक्ष म्हणून तहसीलदार राहुल पाटील तहसील कार्यालय धानोरा होते व प्रमुख पाहून म्हणून अजमन मायाराम राऊत माजी पचांयत समिती धानोरा, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, गटशिक्षण अधिकारी आरवेली धानोरा, सरपंच वासुदेव उसेंडी ग्रामपंचायत येरकड, सरपंच शेवंता हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा, सरपंच मोनिका पूडो ग्रामपंचायत सावरगाव, उपसरपंच प्रकाश हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा, नायब तहसीलदार आम्रपाली लोखंडे तहसील कार्यालय धानोरा, तालूका कृषी अधिकारी एन.एच.बाबर धानोरा, मूनिर शेख मुरुमगाव, बैसाकूराम कोटपरिया मुरुमगाव, सदस्य अभिजीत मेश्राम ग्रामपंचायत मुरुमगाव, सदस्य राजेंद्र कोठवार ग्रामपंचायत मुरुमगाव, सदस्य क्रिषणाबाई भक्ता ग्रामपंचायत मुरुमगाव, सदस्य चारूलता मार्गीया ग्रामपंचायत सदस्य मुरुमगाव, रोहीदास मार्गीया खेडेगाव, तलाठी लाडवे मुरुमगाव, तलाठी मेश्राम सावरगाव, तलाठी साई कोडाप कोसमी, मंडल अधिकारी प्रमोद धाईत मुरुमगाव, आणी मुरुमगाव, कोसमी, सावरगाव, व पन्नेमारा येथील संपूर्ण सरकारी कोतवाल वर्ग, व अगंनवाडी सेविका व आशा वर्कर, आणी मुरुमगाव व परिसरातील हजारो महिलांनी आपली प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली.
या काय॔क्रमात जि.प. उच्च प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव व स्व. रामचंद्र दखने विद्यालय मुरुमगाव येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक रंगारंग काय॔क्रम आयोजित केला. पन्नेमारा येथील चार दिव्यांग लाभार्थीनी सायकल वाटप करण्यात आले तसेच उमेद तर्फे बचतगटातील महिलांना धनादेश देण्यात आले व उमेद मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सौ.अर्चना देशमुख, चारूलता मार्गीया, जोगेश्वरी ताराम व ईतर महिलांचे सत्कार करण्यात आले व तहसील कार्यालय धानोरा तर्फे महिलांना जॉब कार्ड, संजय गांधी निराधार, रेशनकार्ड, वाटप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव तर्फे वीस महिला लाभार्थीना गोल्डन कार्ड वाटप आणि 100 महिलांचे गोल्डन कार्ड बनवून देण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव यांनी महिलांना गोल्डन कार्ड व आरोग्य सुविधा जनक परिपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रशासकीय प्रत्येक विभागाचे स्टाल लावण्यात आले होते.
या कार्यक्रमात सुरुवातीस मडंळ अधिकारी प्रमोद धाईत यांनी मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे बि.जे.चिचोळकर यांनी स्वागत गीत सादर केला व डॉ. राहूल बनसोड, अजमन मायाराम राऊत, सौ.लताताई पूगांटे, सेवंता हलामी, आणी तहसीलदार राहुल पाटील यांनी उपस्थित महिलांना महिलांना सशक्तीकरण बद्दल व शासकीय योजनेंतर्गत माहिती दिली व महिलांनी बळकट व आत्मनिर्भर कसे राहावे व महिलांचे अधिकारा बद्दल संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करण्यात आले .
त्याच प्रमाणे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरन मेळावा मध्ये प्रामुख्याने हजारो महिलांनी आपली उपस्थिती दिल्याबद्दल भाजपा तालूका अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे व तहसीलदार राहुल पाटील तहसील कार्यालय धानोरा यांनी महिलांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन साई कोडाप, आभार नायब तहसीलदार देवेंद्र वाळके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here