The गडविश्व
चिमूर / नेरी, ६ जून : तालुक्यातील नेरी येथील सलुन चालकाने आपल्या दुकानाच्या आवारातच गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना ६ जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अनिल शालिकराम बारसागडे (अंदाजे वय ४०) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नेरी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतक अनिल बारसागडे यांचे माही हेअर सलुन चे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते आज दुकानात गेले मात्र दुपारच्या सुमारास घरी न आल्याने मुलाने दुकानाकडे जाऊन बघितले असता वडील दुकानाच्या आवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी चिमुरला नेले. मृतकाच्या मागे पत्नी, डोना लहान मुले असा आप्त परिवार आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
(the gdv, the gadvishva, chimur, neri, chandrapur)