– संकेतस्थळ व मोबाईल ॲप चा करा वापर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र भारत निवडणुक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर नियमितपणे अपलोड करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना उमेदवारांची माहिती सहजपणे जाणून घेता येणार आहे. यासोबतच ‘नो युवर कॅन्डीडेट’ (Know Your Candidate-KYC) या ॲपच्या माध्यमातूनही उमेदवारांची माहिती व गुन्हेगारी पूर्ववृत्तबात माहिती जाणून घेता येणार आहे. हे ॲप अड्रॉईड व आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.
नागरिकांनी या संकेतस्थळावरून व मोबाईल ॲप द्वारे उमेदवारांनी सादर केलेली माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath #loksabhaelecation2024)