– जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन
The गडविश्व
अहेरी, २९ डिसेंबर : तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग गडचिरोली अंतर्गत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कार्य काळात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली असुन सदर विहीर व टाकीचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. व्येंकटरावपेठा येथे गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नव्हते मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन संपन्न झाले. टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असल्याने प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ. मिनाताई गर्गम ग्रा. पं.सदस्य, जयाबाई तेलंगे ग्रा. प. सदस्य, शामराव राऊत माजी उपसरपंच गुलाबराव सोयाम ग्रा. प. सदस्य, दिलीप मडावी सरपंच,महेश दहागवकर, रवी सडमेक, विश्वेश्वर पागे,नारायण राऊत, लव खुश आईलवार , करण वनपाकलवार, हरिबाबा राऊत राजु भोयर,संदीप राऊत. शिपाई ग्रा.प , शंकर वनपाकलवार, शंकर कांबळे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, नरेंद्र गर्गम, केशव सडमेक, संपत मडावी, सदाशिव राऊत, प्रकाश पेंदाम, डौलत कनाके व गावातील नागरिक उपस्थित होते.