The गडविश्व
सिरोंचा, १४ सप्टेंबर : तालुक्यातील जाफराबाद येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीनिवास कुम्मरी यांचे पत्नी- पोसक्का श्रीनिवास कुम्मरी यांची डेंगू या आजाराने दुर्दैवी निधन झाले होते. या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी आविसचे कार्यकर्त्यांसमवेत तेरवी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवून श्रीनिवास कुम्मरी कुटुंबियांचे विचारपूस करून सांत्वन केले.
यावेळी ग्रामपंचायत जाफराबाद चे उपसरपंच स्वामी गोदारी, ग्राम पंचायत वेंकटापूर चे माजी उपसरपंच महेश मेडी, रमेश कुम्मरी, शंकर कुम्मरी, संतोष दुर्गम, वेंकटेश दुर्गम, लक्ष्मण बोल्ले, गणेश राच्चावार सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.