– भूमिका स्पष्ट करण्याची बबन गायकवाड यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १३ जानेवारी : शासनाने धान उत्पादक शेतकन्यांसाठी हेक्टरी १५ हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बोनस जाहीर केले. सदर रक्कम यापुर्वी आधारभूत केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक नफा कमविण्यासाठी व बोनस दिल्या जात होती. परंतू यावर्षी सदर बोनस रक्कम आधारभूत केंद्रावर धान विकले नसले तरी सर्वच शेतकऱ्यांना दिली जाणार आहे काय ? ही मिळणारी राशी धानावरील बोनस नसून शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन राशी आहे काय ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असून मिळणाऱ्या धानाच्या बोनस बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पत्र काढून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे बबन गायकवाड प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
ग्रामीण भागात बरेच व्यापारी शेतकऱ्यांचे सातबारे जमा करून मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर धान आधारभूत केंद्रावर विकतात. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली रक्कम जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तेव्हा व्यापारी सदर शेतकऱ्यांची रक्कम धानाचे बोनस रक्कम म्हणून लुबाडणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी शासनाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून सदर रक्कम ही प्रोत्साहनपर राशी शेतकऱ्यांची असून व्यापाऱ्यांना रक्कम दिल्या जाऊ नये, असे पत्र शासनाने काढून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी बबन गायकवाड यांनी केली आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (former)