– भाजप प्रदेशाध्यक्ष बावणकुळे यांच्या उपस्थित प्रवेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत पत्नी डॉ. चंदा कोडवते सह भाजपामध्ये आज प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसपक्षाला खिंडार पडली आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीकरीता डॉ.नितीन कोडवते हे इच्छुक होते मात्र या क्षेत्रासाठी डॉ. किरसान यांचे नाव निश्चित झाल्याचे कळताच डॉ.कोडवते दाम्पत्यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकत भाजपा प्रदेशाध्यक्ष बावणकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रासाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अदयापही सुटलेला नाही. आता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले व आता भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. नितीन कोडवते यांना भाजप कडून या क्षेत्रासाठी उमेदवारी मिळाणार काय ? याकडे लक्ष लागले आहे.
LIVE |📍 मुंबई | पक्षप्रवेश कार्यक्रम व माध्यमांशी संवाद (22-03-2024) https://t.co/uoXs0N6dB0
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 22, 2024
(#bjp #kodwade #nitinkodvate #chandakodwate #drkodwate #bjpmaharashtra #thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchiroli news #crimenews #naxal )