– सर्वाधिक सदस्य भाजपा समर्थित ग्राम विकास पॅनलचे
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २० डिसेंबर : तालुक्यात घेण्यात आलेल्या कुंभीटोला व नवेझरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट जनतेमधून सरपंचपदी काँग्रेस समर्थित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत तर कुंभीटोला ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सबका साथ सबका विकास ग्राम विकास पॅनल चे सात पैकी सर्वाधिक चार उमेदवार निवडून आणत उपसरपंच पदावर ग्रामविकास पॅनलचा उपसरपंच बनणार आहे.
कुंभीटोला ग्रामपंचायत येते एकूण ५६६ मतदानापैकी ४९२ मतदान झाले असून त्याची टक्केवारी ८६.९३ इतकी झाले यामध्ये २५२ स्त्रियांनी व २४० पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी सरपंच उर्मिला नरेश हलामी यांना २६४ मतदान मिळाले तर ताराबाई मडावी यांना २२६ मतदान मिळाले व दोन मत नोटा यापैकी नाही. कुंभीटोला ग्रामपंचायत सदस्यपदी सबका साथ सबका विकास ग्राम विकास पॅनल यांचे विजयी उमेदवार मृणाल किशोर भांडारकर, हेमंत पोरेटी, उर्मिला हेमराज पोरेटी, प्रियंका कैलास जनबंधू, विजयी झाले तर ग्राम परिवर्तन पॅनल मधून मधुकर गावडे, अर्चना गेडाम, महेंद्र जनबंधू यांनी विजय मिळविला.
ग्रामपंचायत नवेझरी येथील निवडणुकीमध्ये सरपंच पदाचे उमेदवार दिगंबर नारायण कोकोडे यांनी विजय संपादन केले तर सदस्या मध्ये गणेश हलामी, मायाबाई काटंगे, कल्पना उसेंडी, मनेश दुगा, प्रांजली उसेंडी, व्यंकट पदा, कविता सिडाम यांनी विजय मिळविला आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाकडून व भाजप पक्षाकडून फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली व दोन्हीही ठिकाणी विजयाचा गुलाल उडवला. यावेळी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जयंत हरडे, नगरसेविका आशाताई तुलावी, नगरसेविका कुंदा तीतिरमारे, नवनाथ धाबेकर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी काँग्रेस समर्थक उमेदवारांचे अभिनंदन केले तसेच यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलु भाई हुसेनी, भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, भाजपा तालुका महामंत्री ॲड. उमेश वालदे, नगरसेवक सागर निरंकारी, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, उल्लास देशमुख, नितिन झोडे, राजू मडावी, किशोर भांडारकर यांनी अभिनंदन केले.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Congress supported sarpanch in Navezri and Kumbhitola)