खोट्या सह्यांची मोहीम राबवून भाजपाला निवडणुकीत पराभूत करण्याचे षडयंत्र

89

– विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनतेला आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील माझे विरोधक मला विधानसभेची उमेदवारी मिळू नये याकरिता मोठ्या प्रमाणावर खोट्या सह्या दाखवून माझ्या विरोधात अपप्रचार करीत आहेत. लोकांकडून खोट्या सह्या करून घेत  वरिष्ठ पातळीवर माझ्या विरोधात षडयंत्र करीत आहेत . अशा सह्यांचा आधार घेऊन खोटे बोलून पक्षाची व जनतेची फसवणूक करीत  आहेत. त्यामुळे जनतेने अशा लोकांपासून सावध सावध राहावे व  सह्या करिता आपल्याकडे आल्यास त्यांस विरोध दर्शवावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.
लोकसभा निवडणूक पूर्वी ही अशाच प्रकारे खोट्या सह्यांची मोहीम राबवून आपल्याच पक्षाची फसवणूक जिल्ह्यातील काही आपल्याच नेत्यांनी केली आहे.  त्याचा परिणामही आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. मूळ भाजपा विरोधी मानसिकता असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तशीच रणनीती तयार केली असून त्या माध्यमातून काँग्रेस व विरोधी पक्षाच्या लोकांना ताकद देण्याचे काम सुरू आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विचाराच्या लोकांनी अशा खोट्या व बेजबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आमिषाला भुलथापाना बळी न पडता तटस्थ उभे राहावे व त्यांचा कडाडून विरोध करावा असे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here