– कुरखेडा मुक्तीपथ शहर संघटनेच्या वतीने एसडीपीओना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली,१६ डिसेंबर : कुरखेडा शहरातील अवैध दारूविक्री बंदीसाठी पोलीस विभागाच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेत सातत्य ठेवण्याची मागणी कुरखेडा मुक्तीपथ शहर संघटनेने उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, कुरखेडाचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
पोलीस विभागाद्वारा कुरखेडा शहरातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात झालेल्या कारवाई मुळे शहरातील अवैध दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची सद्यस्थिती आहे. हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी पोलिस विभागाने कारवाईची मोहीम सुरूच ठेवावी. अशी मागणी कुरखेडा मुक्तीपथ शहर संघटनेच्या वतीने एसडीपीओ झरकर यांच्याकडे करण्यात आली. झरकर सरांनी याबाबत संघटनेच्या सदस्यांना ग्वाही दिली तसेच दारुविक्री सुरू असल्यास पोलिस विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. सोबतच मुक्तीपथद्वारे तालुक्यात सुरु असलेल्या कार्याची त्यांनी दखल घेऊन अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मुक्तीपथ कार्यकर्त्यांना दिली. यासंदर्भातील निवेदन पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर, उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांनाही सादर करण्यात आले.
९० जणांचे स्वाक्षरी असलेले निवेदन डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. शुभदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. यावेळी सुधाताई नाकाडे, आशाताई बानबले, रेखाताई रासेकर, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर (सामाजिक कार्यकर्ते), प्रा.डॉ. संजय महाजन, मायाताई लांडेकर, संगीताताई मडावी, वच्छनंदा कोसारे आणि मुक्तीपथ तर्फे मयूर राऊत, विनोद पांडे, कान्होपात्रा राऊत उपस्थित होते.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Kuldeep Yadav) (Govinda Naam Mera) (Thailand Princess Bajrakitiyabha) (Horoscope) (Muktipath) (Kurkheda)