‘प्रत्यक्ष काम व अंनुभवातून शिक्षण देणारा अभ्यासक्रम’ : डॉ. अभय बंग

29

– ‘सर्च’ व गोंडवना विद्यापीठाच्या ‘स्पार्क’ तुकडी तीनचा शुभारंभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : “स्पार्क” या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम तुकडी तीन चा नुकताच उद्घाटन सोहळा बुधवार २३ ऑक्टोबर रोजी सर्च, शोधग्राम गडचिरोली येथे संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ‘सर्च’चे संचालक तथा स्पार्क अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. अभय बंग हे होते, प्रमुख अतिथी गोंडवाना विद्यापीठाचे ननवसा उपक्रमाचे संचालक मनीष उत्तरवारझ मॉडेल डिग्री कॉलेजचे प्राचार्य कृष्णा कारो तसेच स्पार्कचे संयोजक तथा सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे, मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, मुक्तिपथचे सांखिकी प्रमुख कमलकिशोर खोब्रागडे व सर्च मधील पदाधिकारी व तिसर्‍या तुकडीला प्रवेश घेतलेले ११ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
स्पार्क अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या तुकडीचे आज उद्घाटन होऊन, अभ्यासक्रम रीतसर सुरु झाला आहे अशी घोषणा यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे कडून करण्यात आली. अभ्यासक्रम नेमका काय आहे. नयी तालीम वर आधारित प्रत्यक्ष काम, शिक्षण व कमाई या त्रिसुत्रीवर आधारित, व प्रत्यक्ष कर्म करून ‘अनुभवातून शिका’ हा आधार असलेला अनोखा अभ्यासक्रम आहे असे डॉ. अभय बंग म्हणाले. हे सांगताना स्वत: ते वर्धा येथे नई तालिम शिक्षण पद्धतीने शिक्षण कसे शिकले यांचे विविध उदाहरण त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संगितले. ज्यांनी यासाठी प्रवेश घेतला त्यांचे अभिनंदन त्यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यातील दारू व तंबाखू या समस्येवर काम करत व्यसनाच्या विषयावरील काम पुढे नेणारा हा अभ्यासक्रम आहे असे म्हणत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अनेक नवे अनुभव व समाजाच्या प्रयोग शाळेत शिक्षण देणारा हा अभ्यासक्रम आहे असे संबोधित करतांना उत्तरवार म्हणाले.
हा अभ्यासक्रम शिकतांना ‘मुक्तीपथ’ अभियानात कामाच्या विविध नव्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. कृती सोबत ज्ञान आणि कौशल्याची जोड हि विशेषत: या अभ्यासक्रमाची आहे. समाजकार्यामध्ये किवा इतर कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची व्यसनावर काम करण्यासाठी प्रत्यक्ष काम करता करता क्षमता व कौशल्य वाढवणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. या अगोदरच्या दोन तुकड्यामधून एकूण २५ विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून विविध ठिकाणी काम करत आहे. तिसर्‍या तुकडीच्या ११ विद्यार्थ्यांचे पहिले प्रशिक्षण २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान सर्च येथे तज्ञ प्रशिक्षकाद्वारे होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण व कामाला सुरुवात केली जाईल. या कार्यक्रमाच्या शेवटी अभ्यासक्रम पूर्ततेचा संकल्प घेत, हे नम्रता के सम्राट हे महात्मा गांधी यांनी लिहलेली प्रार्थना घेऊन उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here