आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण

77

The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १९ : शहरात मागील पाच दिवसापासून मॉर्निंग क्रिकेट क्लब च्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन धानोरा तालुका क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले होते. त्या क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण १८ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विजय संघांना बक्षीस वितरण केले.
महाकाली क्रिकेट क्लब औंधी यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस ३३ हजार रुपये देण्यात आले. तर दुसरे बक्षीस एमसीसी क्रिकेट क्लब मंडळ धानोरा यांना २१ हजार रुपयांचे बक्षीस आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला, यावेळी क्रिकेट खेळाडू तसेच सुभाष दात, माजी नगरसेवक साजन गुंडावर, युवा नेता सारंग साळवे धानोरा, नगरसेवक सुभाष खोबरे, लंकेश माशाखेत्री नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वार्ड धानोरा शहरातील वार्ड क्रमांक २,३,४,१३,१०,११ या प्रभागामध्ये पाण्याची समस्या बाबत नागरिकाचे म्हणणे ऐकून घेतले व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here