The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १४ डिसेंबर : तालुक्यातील मुरुमगाव येथील CRPF 113 बटालियन मुरुमगाव तर्फे जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरुमगाव येथील शालेय विद्यार्थ्यांकरिता ग्रंथालय साहित्यांचे वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम १२ डिसेंबर ला जि.प. उच्च प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव येथील शाळेच्या पटांगणात घेण्यात आला. या काय॔क्रमाचे उदघाटन द्वितीय कमांडेंट अधिकारी अनिल शर्मा CRPF बटालियन 113 धानोरा यांनी केला तर या काय॔क्रमाचे अध्यक्ष माजी सभापती अजमन मायाराम रावते पं.स.धानोरा, व प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव, मुख्याध्यापक भिमराव भूसाजी भैसारे मुरुमगाव, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक सचिन थेगं मुरुमगाव, साहाय्यक कमांडेंट टोनसिहं CRPF बटालियन 113 धानोरा, डि.व्ही. ठोसरे, शिक्षिका खेवले, सिक्षिका बेंद्रे, सिक्षिका किरंगे, शिक्षिका चौधरी, शिक्षक खोब्रागडे, शिक्षक बावने,
या काय॔क्रमात अजमन मायाराम रावते, पोलीस उपनिरीक्षक सचिन थेगं, भैसारे, डाॅ.राहूल बनसोड, तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला खेळ व उच्च शिक्षणाबद्दल योग्य मार्गदर्शन केले. या ग्रंथालय वाचनालय साहित्य मध्ये दोन आलमारी, टेबल तीन, खुर्ची बारा, व ११५ पुस्तके मुलांच्या भविष्य व शिक्षणाकरता CRPF बटालियन 113 तर्फे देण्यात आले.
हा कार्यक्रम कमांडेंट जसवीर सिंह CRPF बटालियन 113 धानोरा यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. या काय॔क्रमाचे आयोजन डी.व्ही. ठोसरे CRPF बटालियन मुरुमगाव यांनी केले. काय॔क्रमाचे संचालन मानिक रोडेकर CRPF बटालियन 113 मुरुमगाव यांनी केले, आभार खोब्रागडे यांनी मानले.