– सी.आर.पी.एफ ३७ बटालियन प्राणहिता कॅम्प येथे रक्तदान शिबिर
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ जून : रक्तदान करा कारण तुम्ही ही कोणाच्या तरी जीवनाचे स्रोत बनू शकता, हा मंत्र डोळ्यासमोर ठेऊन जागतिक रक्तदान दिना निमित्त १४ जून २०२३ रोजी ३७ बटालियन, सी.आर.पी.एफ, प्राणहिता कॅम्प मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ०९ बटालियन, ३७ बटालियन आणि १९१ बटालियन च्या अधिकारी आणि जवानांनी रक्तदान करून “वेळेचा प्रत्येक क्षण आणि रक्ताचा प्रत्येक कण अमूल्य आहे” असा संदेश दिला. तुमचे रक्तदान एखाद्यासाठी वरदान ठरेल. सी.आर.पी.एफ, चे कार्य केवळ गोळीबार करणे एवढेच नाही तर गरज पडेल तेव्हा रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवण्यातही ते नेहमीच पुढे असतात.
या शिबिरात एकूण ४१ अधिकारी व जवानांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्याकरिता डॉ. डी.एस.मोहन, मुख्य वैद्यकीय अधिकारी ०९ बटालियन, डॉ. रोकडे, (एम.डी.), पॅथॉलॉजिस्ट, सिव्हिल हॉस्पिटल, गडचिरोली आणि रक्तपेढी, एस.डी.एच. अहेरी च्या डॉ. अश्विनी देवगडे, यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यावेळी सी.आर.पी.एफ, च्या ३७ बटालियन चे कमांडंट एम.एच.खोब्रागडे म्हणाले की, कधीही रक्ताची गरज भासल्यास युनिटशी संपर्क साधा, त्यांना रक्त उपलब्ध करून दिले जाईल आणि कोणत्याही स्थानिक व्यक्तीवर सी.आर.पी.एफ, रुग्णालयात उपचार करायचा असेल तर ते उपचार करू शकतात, त्या रुग्णाला शक्य तितकी मदत केली जाईल असे सांगितले. शेवटी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्षातून किमान दोनदा रक्तदान करून कोणाच्या तरी जीवनदानात आपले महत्त्वाचे कर्तव्य पार पाडावे अशी विनंती केली.
आर. एस. बालापूरकर, कमांडंट ०९ बटालियन, सी.आर.पी.एफ, श्री विमल राज, द्वितीय कमांडिंग ऑफिसर (परिचालन) – ०९ बटालियन, नितीन कुमार, डेप्युटी कमांडंट ०९ बटालियन, डॉ. श्रीनिवासुलू रेड्डी, ३७ बटालियन चे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, या शिबिरात उपस्थित होते. संतोष भोसले (असिस्टंट कमांडंट), ३७ बटालियन चे एडज्युटंट, डॉ. अरविंद सातोरे, ३७ बटालियन चे वैद्यकीय अधिकारी, अधीनस्थ अधिकारी, ०९ बटालियन आणि ३७ बटालियन चे जवान उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, blood donate camp crpf gadchiroli )