जि.प.उच्च प्राथ शाळा साखरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम तथा स्नेहमिलन सोहळा संपन्न

265

The गडविश्व
ता. प्र / सावली, ८ फेब्रुवारी : तालुक्यातील साखरी येथील जि.प.उच्च प्राथ शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम तथा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि गावातून बाहेरगावी विविध पदावर काम करीत असलेल्या युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून दादाजी पाटील किनेकर उपसरपंच, महादेव मडावी अध्यक्ष शा.व्य.स., दीप प्रज्वलक राकेश गड्डमवार माजी सभापती, आशिष भांडेकर अध्यक्ष वन स.रविंद्र गेडाम स.ग्रा.प., सौ. संपदा बोरेवार उपाध्यक्ष शा.व्य.स, तामदेव कावळे, धर्मराव बावणे, सौ.जयमाला गेडाम स.शा.व्यस, ग्राम पंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील सत्कारमूर्ती तसेच प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय घोंगे मुख्याध्यापक, संजय ताडाम, वामन चौधरी, विवेक कामिडवार, शाळा व्य.समिती तसेच गावातील युवकवर्ग आदी यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन चौधरी यांनी केले, तर प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक विजय घोंगे यांनी केले, कार्यक्रमांचे आभार संजय ताडाम यांनी मानले.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bank of Baroda) (Kriti Sanon) (Bing) (Lakers) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (Chandrapur News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here