The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑगस्ट : जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील नियोजन भवन येथे डी.जी.एफ.टीच्या वतीने निर्यातवाढी संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ऑगस्ट आयोजन करण्यात आले होते.
Asstt. DGFT श्रीमती स्नेहल ढोके यांनी डी.ई.एच (DEH) चे महत्व स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, डीजीएफटीचे सादरीकरण (presentation) सोपे आणि विशेषत: नवीन निर्यातदारांसाठी केंद्रित आहे. स्थानिक उद्योजकांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. श्रीमती ढोके यांनी डी.जी.एफ.टी. नागपूरच्या व्हि.सी. लिंक बद्दल देखील सांगितले ज्याद्वारे निर्यातदार आणि नवीन येणाऱ्यांचे प्रश्न थेट डी.जी.एफ.टी. द्वारे सोडवले जाऊ शकतात. स्थानिक निर्यातदारांसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली आणि भविष्यातही असे कार्यशाळेचे होणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील निर्यातवाढी संदर्भातील ही कार्यशाळेच्या वेळी वनविभाग, पर्यटन विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, पोष्ट ऑफीस, Indian chamber of International and Business, कृषी विभाग उपस्थित होते.
श्रीमती स्नेहल व्हि. ढोके, Asstt DGFT, office of Addl. DGFT Nagpur यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याला पहिल्यांदा भेट देत असून गडचिरोली हे समृद्ध वन असल्याने आणि जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीला चालना देण्यासाठी केवळ वस्तूंवर नव्हे तर पर्यटनाला सुद्धा सेवा निर्यात म्हणून करण्यात यावे, म्हणून डीजीएफटी नागपूर या Export Outreach कार्यक्रमाचे माध्यमातून जिल्ह्यातून सेवा निर्यात म्हणून पर्यटनाला चालना देत आहे. याकरीता डीजीएफटी, नागपूर ने पर्यटन संचालनालय आणि वन विभाग सोबत घेतले आहे.
जिल्ह्यात जास्तीत जास्त निर्यात व्हावे या उद्देशाने डीजीएफटी, नागपूर ने या कार्यशाळोचे आयोजन केले आहे. यावेळी डीजीएफटी, नागपूर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.