The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १० : तालुक्यातील कुंभीटोला येथील आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक रामा कांडे पोरेटी(६४) यांचे काल सायंकाळी ६ :१५ मिनिटांनी दीर्घ आजाराने घरीच निधन झाले.
त्यांच्या पार्थिव शरीरावर शुक्रवार १० जानेवारी रोजी दुपारी ०१ : ०० वाजता सती नदीच्या काठावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी, दोन मुली, एक बहीण एक भाऊ सून व नातवंडा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.