The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ जून : तालुक्यातील मुरुमगाव
येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालयाचा एस. एस. सी.बोर्डाचा निकाल ९२ टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक,व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
या निकालात शाळेतील पाच विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत आहेत. नागपूर बोर्ड च्या निकालात मुलींची सरशी बघता या विद्यालयाच्या पाच विद्यार्थिनी नी प्रथम श्रेणी गाठली. यामध्ये विद्यालयातून कु.सुनिधी गणेश भारद्वाज ही विद्यार्थिनी अव्वल आली ,तिला ८७.२० टक्के गुण मिळाले तर अनुक्रमे कु.विनिता आसाराम ओडमडीया ८१.४० टक्के, कु. शबनम सुनील तिर्की ८१ टक्के , कु,महेक मो. शरीफ ७९.८० टक्के , कु.शु श्मिता बिरसिंग धूर्वे ७४.२० टक्के विद्यालयाचा निकाल उंचावला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्षा कमलाबाई दखणे, सचिव महेंद्रजी दखणे, कोष्याध्यक्षा करीमा देवानी,संस्था सदस्या, मुख्याध्यापक एस. जी. सुरणकर व पालक वर्गानी कौतुक केले आहे.