मुरुमगाव धान घोटाळ्याच्या तपासाला गती देण्याची मागणी

590

– मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता ?
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २६ फेब्रुवारी : तालुक्यातील मुरुमगाव अविका संस्थेत तीन करोड रुपयांच्या धान घोटाळा प्रकरणात आत्तापर्यंत एकुण सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दोन आरोपीनी अटक पूर्व जामीन मिळाला. मुरुमगाव धान घोटाळ्याच्या मुळा पर्यंत जाऊन तपासाची गती वाढवून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेमार्फत करण्यात येत आहे. सदर धान्य घोटाळा प्रकरणातील पाळेमुळे खुप खोलवर पसरलेले असून चौकशीत मोठे मासे गळाला लागण्याचीही शक्यता असुन एकूणच प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव आविका संस्थेमध्ये मागील खरीप हंगामात तीन करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत सहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यातील धान खरेदीच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अजूनही सापडलेला नाही. या घोटाळ्याची मुळे खूप खोलवर पसरलेले असून यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर आविकांतिल केंद्र प्रमुख, व्यवस्थापक, अधिकारी, व्यापारी आणि संचालक मंडळ यांच्या संयुक्त मुस्सद्देगिरीने शासनाला करोडो रुपयांचा चुना लावला. असा प्रकार मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी चालु असल्याचे बोलल्या जाते. मात्र अनेक शंका आज निर्माण करताना दिसतात. शासन सोसायटी चे ऑडिट करतात कि नाही, सोसायटी ची रिकव्हरी केल्या जात नाही का ? शासनाच्या पैशावर कोणीही डल्ला मारताना दिसतो.
सरकारी मालाची चौकशी न करता अफरातफर करून शासकीय कामाचा विल्हेवाट लावण्यात अनेक व्यापाऱ्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या घोटाळ्याची पाळेमुळे खूप खोलवर पसरलेली असतानाच यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशी करून उर्वरित आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Crystal Palace vs Liverpool) (Jake Paul vs Tommy Fury) (Real Madrid vs atlético Madrid) (Bournemouth vs Man City) (Leicester City vs Arsenal) (Sergio Ramos) (The Gdv) (Leopards live in the house) (Sindewahi) (Chandrpur) (kota) (Murmadi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here