– १८ गोवंशाची सुटका
The गडविश्व
गडचिरोली, ६ सप्टेंबर : कत्तलीसाठी अवैधरित्या गोवंशांची वाहतुक करणाऱ्या गोतस्करांच्या देसाईगंज पोलिसांनी मुसक्या आवळत वाहनासह तब्बल १७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ४ सप्टेंबर रोजी केली.
मोहम्मद जाकीर मो. इब्रााहीम रा. चंगेमुल, गंजय अरुण किस्टया रा. मेडीपल्ली दोघेही राज्य (तेलंगना), नरेश नागदेव पारधी, रविंद्र दयाराम कुथे दोघेही रा. गांधीनगर तह. देसाईगंज जि. गडचिरोली असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. सदर कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान ४ सप्टेंबर रोजी ट्रकमध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याच्या गोपणीय माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर यांनी पोना/दिनेश राऊत व पोअं/नरेश कुमोटी, विलेश ढोके यांचेसह सावंगी ते गांधीनगर मार्गावर टी. एस. १२ यु.ए. ०७८९ क्रमांकाच्या ट्रकला थांबवुन वाहनाची पाहणी केली असता, वाहनामध्ये १८ गोवंशीय जनावरे मिळून आली. याप्रकरणी मोहम्मद जाकीर मो. इब्रााहीम रा. चंगेमुल, गंजय अरुण किस्टया रा. मेडीपल्ली दोघेही राज्य (तेलंगना), नरेश नागदेव पारधी, रविंद्र दयाराम कुथे दोघेही रा. गांधीनगर तह. देसाईगंज जि. गडचिरोली यांचे ताब्यातील ट्रक अंदाजे किंमत अंदाजे १६ लाख रुपये व १८ गोवंशीय जनावरे अंदाजे किंमत १ लाख ९० हजार रुपये असा एकुण १७ लाख ९०हजारांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुद्ध पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास परि. पोउपनि. प्रविण बुंदे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली साहिल झरकर सा. यांचे मार्गदर्शनात व देसाईगंज येथील पोनि. किरण रासकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
( the gdv, the gadvishva, gadchiroli news, crime news gadchiroli, desaiganj)