– ओळख पटविण्याचे आव्हान
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, ३० जुलै : तालुक्यातील सावंगी येथील शांतीनगर जवळील नदी पात्रात चिखलाने माखलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
नदी पात्रात मृतदेह असल्याची माहिती आज गावातील नागरिकांना कळताच बघण्याकरीता मोठी गर्दी केली. याबाबत तात्काळ देसाईगंज पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविले. मृतकाची अद्याप ओळख पटली नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, desaiganj wadsa sawangi, Stuart Broad, Shubman Gill, Leo, Barcelona vs Real Madrid,Sanju Samson,Bangladesh,UFC,)