देसाईगंज : गावतलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

1252

– घटनेने गावात हळहळ
The गडविश्व
देसाईगंज, दि. २० : गावालगत असलेल्या तलावात बुडून आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे उघडकीस आली. आली.वंश विजय भुते (वय ८ ) रा.कोंढाळा, ता.देसाईगंज, जि.गडचिरोली असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंश हा घराजवळील तीन ने चार आपल्या सवंगड्यासोबत आज दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. काही वेळाने सोबतची मुले घरी परतली मात्र वंश हा एकटाच तलावाजवळ होता. दरम्यान गावातील काही नागरिक सतातच्या पावसाने तलाव किती भरले हे पहावयास गेले असता तलावात एक मुलगा तरंगताना दिसून आला. पायरीवर शालेय गणवेश अधलून आल्याने याबाबत माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देण्यात आली असता तलावात तरंगत असलेल्या मुलाला बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याची ओळख पटली. घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णलयामध्ये पाठविण्यात आले.
पुढील तपास देसाईगंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस करीत आहे.
वंश हा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकत होता. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #desaiganj #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here