The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज : वन विभागामार्फत श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती रावणवाडी टोली तर्फे ३० लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
वन विभागातर्फे ग्रामीण भागातील कुटुंबांना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शन देण्यात येते. यामुळे गावातील नागरिकांचे सरपण वापर कमी होऊन जंगलाचे संरक्षण होते. नवीन गॅस कनेक्शन वितरण करतांना क्षेत्र सहाय्यक कंकलवार, उपसरपंच धनंजय तिरपुडे, पोलीस पाटील शाम उईके, समिती अध्यक्ष गिरीधर नेताम, सचिव एस.एल.कांबळे, वन कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच कोरेगाव चोप जंगल परिसरात वाघाचा वावर आढळून आल्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे दिवस-रात्र गस्त सुरू आहे त्यामुळे वन विभागाला सहकार्य करून जंगलात कुणीही जाऊ नये तसेच वाघाचा वावर आढळल्यास त्वरित वन विभागाला संपर्क करावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Tejasvi Surya) (Crystal Palace vs Man United) (Wolves vs Liverpool) (SBI PO Prelims Result) (JEE Main 2023 Admit Card)