– २२३ विद्यार्थ्यानी घेतला सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : शिव जन्मोत्सव समिती कोंढाळा, संयुक्त वन व्यवस्थापन समितीझ पी एम श्री शाळा, विद्या निकेतन शाळा यांचा संयुक्त विद्यमाने कोंढाळा गावातील शाळांमध्ये २२३ विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व सपर्धामध्ये सहभाग दर्शविला.
आठ वर्षापासून दरवर्षी शिव जन्मोत्सव समिती कडून परीक्षा घेतल्या जायची. परंतु यावर्षीपासून गावातील शाळा व समितीचा संयुक्त माध्यमाने पंधरवडा साजरा करीत असून २ फेब्रुवारीला संत तुकाराम महाराज यांचा जयंती पित्यर्थ चार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
स्पर्धेला सुरवात करण्यापूर्वी पाहुण्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोला पुष्प मल्यार्पन करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. या स्पर्धा निमीत्त पांडुरंग बुराडे ग्रामसेवक यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा झपाट्याने वाढत आहेत. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थी फार मागे असलेला पहायला मिळतो. हा ग्रामीण विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत मागे राहू नये. त्यांची शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, या साठी शिव जन्मोत्सव समिती कडून साजरी केली आहे.
मंडळातर्फे ९ वर्षापासून दरवर्षी नि:शुल्क विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा , निबंध स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या स्पर्धेला व मार्गदर्शन सोहळ्याला सरपंचा अपर्णा राऊत, सुनील पारधी भाजपा तालुका अध्यक्ष, गजानन सेलोटे उपसरपंच, किरण कुंभलवार पोलीस पाटील, निखिल गोरे फेलो मिनिस्ट्री पंचायत राज, अरुण कुंभलवार सामाजिक कार्यकर्ता, प्रदीप तूपट, पंकज धोटे प्राध्यापक उपस्थीत होते.
या मार्गदर्शन सोहळा चे प्रस्ताविक प्रदीप तुपट यांनी केले तर आभार मदन पचारे यांनी मानले. या स्पर्धेला नितेश पाटील, रोशन ठाकरे, आशिष दोनाडकर, जयंत दुपारे, अजय चंद्रवंशी, नंदू बेहरे, अंकित शेंडे, दिनेश मैंद , मदन पचारे, अजय भरे, सोमेश्वर आडकिने, अतुल वनस्कार, आशिष खोब्रागडे, सूरज झिलपे, विकास मोहूर्ले, आकाश पेटकुले यांचे सहकार्य लाभले .