देसाईगंज : दारूची अवैध वाहतूक, पोलीसांनी आवळल्या मुसक्या

971

– दुचाकी वाहनासह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १७ डिसेंबर : ब्रह्मपुरी येथून दुचाकी वाहनाने दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा कारवाई करत दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या देसाईगंज पोलिसांनी मुसक्या आवळत दुचाकी वाहणासह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय तुकाराम बुल्ले (४५) रा. मोहटोला, लखबीर सिंग रणबीर सिंग बावरी (२५) रा. गोकुल नगर असे आरोपींची नावे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र शेजारील चंद्रपूर जिल्ह्यतून छुप्या मार्गाने दारूची तस्करी केल्या जाते. ब्रम्हपुरी येथून दारूची वाहतूक होत आहे अशी गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली असता पोलीस निरीक्षक मेश्राम सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पो. अमलदार निकलेश सोनवणे यांनी पटेल लान जवळ सापळा रचला असता बजाज कंपनीची डिस्कवर वाहन क्रमांक MH 40 AE 2824 मध्ये टायगर ब्रँड देशी दारूच्या ९० मिली मापाच्या १०० निपा किंमत १० हजार रुपये व वाहनाची किंमत ६० हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपयाच्या माल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला.
याप्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अप क्र.0516/2022 कलम 65 (A),83,98 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here