The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. २७ : वडसा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्रूा नियतक्षेत्र चोप अंतर्गत येत असलेल्या डोंगरमेंढा कक्ष क्र. ९०२ मधील जंगलामध्ये मादी बिबट जखमी असस्थेत आढळुन आल्याची घटना बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ रोजी उघडकीस आली. वनविभाने सदर मादी बिबटला जेरबंद करून पुढील उपचाराकरिता नागपूर येथे दाखल करण्या आले आहे.
वडसा वनविभागात मोठया प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक वनपरिक्षेत्र वडसा हे नियमित गस्त करीत असतांना नियतक्षेत्र चोप अंतर्गत येत असलेल्या डोंगरमेंढा कक्ष क्र. ९०२ मधील जंगलामध्ये अदाजे ३ ते ४ वर्ष वय असलेली मादी बिबट जखमी अवस्थेत आढळुन आली. यावेळी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक व उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा स्थित वडसा वनविभाग यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) वडसा कैलास धोडणे यांच्या नेतृत्वाखाली जलद बचाव पथक गडचिरोली डाॅ. मृणाल टोंगे पशुवैद्यकीय अधिकारी गडचिरोली वनविभाग, यांनी जखमी मादा बिबट व प्राथमिक उपचार करीता आ.आर.टी चमु गडचिरोलीचे अजय कुकडकर, कुणाल निमगडे, मकसुद सैय्यद, निखील बारसागडे, पंकज फरकाडे व गुणवंत बाबनवाडे यांच्या मदतीने जेरबंद करून उपवनसंरक्षक वडसा वनविभाग यांच्या सुचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. मृणाल टोंगे यांच्या देखरेखखाली गोरेवाडा रेस्कु सेंटर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले असुन सद्यास्थितीमध्ये जखमी बिबट ची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. दरम्यान मादी बिबट जखमी होण्याचे कारण कळु शकले नाही.
