– रेल्वे पटरी पासून काही अंतरावर आढळला मृतदेह
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज (Desaiganj) ६ डिसेंबर : शहरातील इसमाची अज्ञाताने हत्या करून मृतदेह बांधीत टाकून दिल्याची घटना ५ डिसेंबर रोजी दुपारी ०१.३० ते २.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अरुण संपत कोवे (५३) रा. शिवाजीवार्ड देसाईगंज वडसा जि. गडचिरोली असेल मृतकाचे नाव आहे.
देसाईगंज वडसा येथील रेल्वे स्थानकापासून १ किमी अनंतरावर गोंदिया कडे जाणाऱ्या रेल्वे पटरीपासून अंदाजे १०० फुटावर असलेल्या बाबुळच्या झाडाखाली बांधीच्या धुऱ्यावर अरुण कोवे यांचा मृतदेह ५ डिसेंबर रोजी दुपारी ०१.३० ते २.०० वाजताच्या सुमारास आढळून आला. घटनेची माहिती तात्काळ देसाईगंज पोलिसांना देण्यात आली असता कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी व देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर घटनेबाबत मृतकाच्या मुलाने आपल्या वडिलास अज्ञाताने डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने वार करून हत्त्या केली अशी फिर्यात पोलीस ठाण्यात दाखल केली असता पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा व पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लाडे करीत आहे.
(The Gadvishva) (Desaiganj) (Wadsa) (Murder) (Gadchiroli News Updates)