देसाईगंज: भरधाव सुमोची दुचाकीला धडक, दोघेजण जागीच ठार

191

– आमगाव – सावंगी मार्गावरील घटना
The गडविश्व
देसाईगंज : भरधाव टाटा सुमोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघजण जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील आमगाव सावंगी मार्गावर 21 ऑक्टोंबर रोजी रात्रो 9 वाजताच्या सुमारास घडली. रोहित दोनाडकर, दिपक सहारे दोघेही रा. गांधीनगर असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नाव असल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, आमगाव – सावंगी मार्गावरून भरधाव जाणाऱ्या टाटा सुमोने रात्रो ९ वाजताच्या सुमारास दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरली दोघेही काही अंतरावर कोसळुन जागीच ठार झाले तर सुमो चालक हा सुमोच्या समोरच्या काचेतुन बाहेर पडला. अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले तर सुमो चालक हा गंभीर जखमी असल्याचे कळते. घटनेची माहिती जवळच्या पोलीसांना देण्यात आली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #desaiganj #accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here