The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २ सप्टेंबर : पतीचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने पत्नी बेशुद्धावस्थेत होती. दरम्यान तिच्यावर नागपुरातील उपचार सुरू होते मात्र तब्बल दहा दिवसांच्या मृत्यूच्या झुंजीत अखेर आज तिनेही श्वास सोडला. सदर घटनेने गावपरिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दहा दिवसापूर्वी देसाईगंज तालुक्यातील चोप येथील मोरेश्वर मारुती मुंडले (५२) यांचा स्वतःच्या शेतात सकाळी दहाच्या सुमारात रासायनिक खत मारत असताना अचानक मृत्यू झाला होता त्यासोबत त्याची पत्नी मीनाक्षी ही सुद्धा शेतावर होती. पतीच्या मृत्यू डोळ्यादेखत झाल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी नेण्यात आले व ती ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी असतानाच मोरेश्वर मुंडले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीचे अंत्यसंस्कार पात्र पडले मात्र पत्नी मीनाक्षी ची प्रकृती बिघडत चालली पाहून ब्रह्मपुरी येथील डॉक्टरांनी तिला नागपूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यास पाठविले असता प्रकृती अधिक बिघडतात चालल्याने डॉक्टरांनी मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच दिवसा अगोदर मेंदूची शस्त्रक्रिया झाली परंतु अखेर मीनाक्षी मोरेश्वर मुंडले हिचा आज शनिवारी दुपारी एक वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. पती-पत्नीच्या या दुखद निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सायंकाळी चोप येथील पाटलीन तलावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगा सासू असा परिवार आहे.