The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. १८ : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. ईशा घनश्याम बिंजवे (वय २४ ) रा. ब्रह्मपुरी असे युवतीचे नाव असून तिचे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती आहे. नदीपात्रातील तिचा व्हिडियोही समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईशा ही मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पुलावर दुचाकी वाहनाने आली. तिथे आपली दुचाकी उभी करून पायातील चप्पल काढून ठेवत नदीपात्रात उडी घेतली. परंतु त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने तीने पुन्हा खोल पाण्यात उडी घेतल्याचे कळते.
त्यानंतर ती खोल पाण्याच्या प्रवाहाकडे वाहात गेली. बऱ्याच अंतरापर्यंत ती पाण्यात बुडालेली नव्हती. त्यामुळे तिला पोहता येत असावे असाही अंदाज व्यक्त केला जात होता. दरम्यान बुधवारी सायंकाळी निलज गावाजवळील नदी पात्रात ईशाचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.
नदीपात्रातील पाण्यामध्ये वाहत असतानाचा तिचा व्हिडियो समोर असला असून समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolicenaxalancounter #breaking #eknathshinde # vaingangariver #wadsa desaiganj )