– कारखान्यात रात्र पाळीत काम करायला गेला आणि झोपेत असतांना सर्पदंश
The गडविश्व
देसाईगंज, दि.१३ : कारखान्यात रात्र पाळीत काम करण्यास गेलेल्या युवकाला मध्यरात्री झोपेत असतांना सर्पदंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार ११ नोव्हेंबर रोजी घडली. अशोक मनोहर लेनगुरे (वय २८) रा. कोंढाळा ता.देसाईगंज, जि. गडचिरोली असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेनगुरे हा १० नोव्हेंबर रोजी रात्रो अंदाजे ११ ते १२ वाजताच्या सुमारास कोंढाळा गावापासून १ किलोमीटर अंतरावरील लहरी कारखान्यात रात्र पाळीत काम करण्यास गेला. काम करतांना त्याला झोप आली दरम्यान झोपते असतांनाच अचानक त्याच्या बोटाला काहीतरी दंश केला असल्याची जाणीव झाली. दरम्यान यावेळी अशोकची भंबेरी उडाली. यावेळी सोबत असलेला व्यक्ती पटकन झोपेतून जागा झाला. त्याने इकडे तिकडे बघितले असता कारखान्याच्या खोलीतच त्याला साप निदर्शनास आला. लगेच प्रसंगावधान साधून घडलेल्या घटनेची माहिती त्याने गावात दिली. माहिती कळताच लगेच कुटुंबीय व गावातील ग्रामस्थांनी धाव घेऊन अशोक ला रात्री २ वाजताच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचाराकरिता भरती केले. मात्र काही कारणास्तव अशोक ला तिथून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. गडचिरोली येथे उपचार सुरू असतांना काही वेळाने अशोक ची प्रकृती खालावल्याने पहाटेच्या सुमारास अशोक ची प्राणज्योत मावळली. अशोक हा गावातील सुशिक्षित, होतकरू, मनमिळावू व सर्वांना आपले समजून साजेसे करणारे व्यक्तिमत्त्व असणारा असा होता. आई वडिलांचा सर्वात मोठा मुलगा होता. अकरावीमध्ये देसाईगंज येथे विज्ञान शाखेमध्ये शिक्षण पूर्ण करून आरमोरी येथे बि.एस. सी चव शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला हातभार लागावा म्हणून स्पर्धा परीक्षा तयारी सोबत कामावर जात होता. मात्र त्याच्या अशा मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.
(the gdv, the gadvishv, gadchiroli news desaiganj, kondhala, hospital gadchiroli, hospitl armori)