The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, (चेतन गहाने) २४ ऑक्टोबर : बौद्धियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन. दरवर्षी भीम अनुयायी हा सण १४ ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात. कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथे १४ ऑक्टोबर ला समाजातीलच दोन युवकांच्या आकस्मिक निधनाने आज विजया दशमीला धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.
भारतात ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मियांसाठी १४ ऑक्टोबर हा दिवस खास आहे, कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.
बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केलं म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.बौद्ध धर्मात प्रवेश केला.
म्हणून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१४ ऑक्टोबर ला गेवर्धा येथील एका बौद्ध समजातिल तरुण युवकाचा आकस्मिक निधन झाल्याने आणि त्यानंतर थोड्या दिवसातच पुन्हा एका विवाहित तरुणाचा आकस्मिक निधनाने संपूर्ण बौद्ध समाज तथा गावात दु:खाच डोंगर कोसळल्याने धम्म प्रवर्तन दिन साजरा करता आले नव्हते, आज विजयादशमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी या कार्यक्रमाचे बौध्द समाज संघटना गेवर्धा यांचे वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्य बौध्द विहार या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटीजी नागिलवार उपसभापती कृउबास आरमोरी हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, पो.पा.भाग्यरेखा वझाडे, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रा.पं.सदस्य हेमंत शिडाम, भोलाभाऊ पठाण, पत्रकार ताहीर शेख, मधुकर पा.शेंडे, राजेंद्रजी कुमरे, मडावी सर, नेवारेजी महाराज, डाकराम मैंद, देवेंद्र नाकतोडे, कृष्णा मस्के आदी उपस्थित होते.