The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑक्टोबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. या दिनाचे औचित्य साधून The Path To a Happy Life (सुखी जिवन मार्ग) अंतर्गत १४ ऑक्टोबर ला धम्मचक्र प्रवर्तनदिन सायंकाळी पाच वाजता गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष वनिता पोवरकर, प्रमुख अतिथी आयु. मायाताई मोहूर्ले, प्रमुख पाहुणे आयु.भावना बोलीवार, आयु. दुशिला एल. जी. प्रमुख मार्गदर्शक आयु. लक्ष्मण मोहुलें, प्रमुख पाहुणे दौलत पोवरे, परशुराम बोलीवार, नंदेश्वर कथले, रोशन इप्पावर, वैष्णवी ईप्पावार होते. यावेळी नितीन मेश्राम व सिमरन मेश्राम यांनी धम्मदीक्षा घेतली.
कार्यक्रमाचे संचालन सतीश दुर्गमवार, प्रास्ताविक आयु. धम्मराव तानादु- कल्याणमित्र व आभार क्षितिज दूर्गमवार यांनी मानले.