The गडविश्व
प्रवीण जोशी / ढाणकी, ४ मार्च : ढाणकी शहर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गो शाळेची उणीव होती व त्यामुळे अनेक भाकड असलेली जनावरांची आबाळ होत होती शिवाय कत्तलखान्याकडे सुद्धा रवानगी होत असल्याचे ऐकिवात होते तेव्हा परिसरात गोशाळा असणे जीक्रीचे व जरुरी बनले होते त्यामुळे काही सुज्ञ लोकांनी गोशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान गोशाळेची निर्मिती स्तुत्य उपक्रमासाठी रुपेश येरावार यांच्या रूपाने दातृत्व आले पुढे आले आहे.
सनातन धर्मिय गाईला मातेची उपमा देऊन तीस पूजनीय मानतात त्यामुळे गोशाळा ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते तसे बघता यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस जनावरांची संख्या घटत चालली आहे व ज्यांच्याकडे जास्त शेती आहे असे शेतकरी मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे विकायची काय या हेतूने ज्या गाईने आपल्याला बरेच काही गोधन दिले. तेव्हा काही पैशात काय विकायचे म्हणून काही शेतकरी अशा गो शाळेत गाईंना आणून सोडतील व गो दान करतील व त्यांचे उर्वरित गुजराण आयुष्य व्यवस्थित होईल व गावरान गाईचे जतन संवर्धन गो शाळेच्या निर्मितीमुळे होईल एवढे नक्की.
पण एवढे मोठे धनुष्य पेलन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे काम नसते त्यात कोणी आर्थिक वाटा उचलायचा असतो तर कोणी आपला वेळ देऊन काम करायचे असते आणि त्यातल्या त्यात गोशाळा स्थापन करणे म्हणजे आर्थिक बाबीचे नियोजन आले आणि मदतीला धावले ते रुपेश विष्णुकांत येरावार यांनी गोशाळेला त्यांच्या लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून १११११ दान देऊन सदर दातृत्व पुढे आले. हल्ली आपण बघतोच आहे की तरुणाई लग्न वाढदिवस साजरा करीत असताना मोठमोठ्या पंचतारांकित अशा हॉटेलमध्ये आपल्या नातेवाईकांना आप्तेष्टांना व मित्रमंडळींना घेऊन कोणताही प्रसंग असो मग लग्न वाढदिवस, शुभ प्रसंग, असो साजरा करतात पण उद्योजक अजातशत्रू व एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आपल्या स्वभावाने तर परिचित आहेत शिवाय त्यांनी आपल्या दातृत्वातून सुद्धा मोठ्या मनाचा प्रत्यय यावेळी आणून दिला नक्कीच त्यांच्या या सत्कर्मामुळे येणाऱ्या काळात गोशाळा अधिकाधिक वृद्धंगीत होऊन व मदतीचा ओघ येऊन दोन-तीन जनावरांची ही गोशाळा काही दिवसात एक वटवृक्ष म्हणून नक्की पुढे होईल तसेच त्यांच्या इतकेच त्यांच्या सहचरणीचे सुद्धा तेवढेच सहकार्य लाभले असे यावेळी रुपेश येरावार म्हणाले. माझी ही संकल्पना मी माझ्या धर्मपत्नीकडे सांगितली आणि तिने सुद्धा माझ्या या संकल्पनेला प्रतिसाद दिला म्हणूनच मी हे सत्कार्य करू शकलो.