– धानोरा येथील प्रकार
The गडविश्व
ता. प्र / धानोरा : नववी पास होऊन दहावीची पायरी न चढता एका फिरते कपडे विक्रेत्यांनी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना नुकतीच धानोरा येथे उघडकीस आली आहे. सदर घटनेने खळबळ उडाली असून शोधाशोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सपना (काल्पनिक नाव) असून ही मुलगी नुकतीच चालू सत्रात नववी पास ची परीक्षा दिलेली आहे. या मुलीचे सरासरी वय १४ वर्षे असल्याचे समजते, तर फिरते कपडे विक्रेत्याचे वय वर्ष ५० हून अधिक असल्याचेही बोलल्या जाते. मात्र या व्यक्तीचे नाव पत्ता कुठल्याच ठिकाणी नोंद नाही. सदर मुलगी ही सोमवार २७ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी कोणीच नसताना निघून गेली. मुलगी कुठेतरी मैत्रीण व संबंधितांकडे गेली असावी व सायंकाळपर्यंत ती घरी येणार असे आई-वडिलांना बाहेरून आल्यावर वाटले. मात्र सायंकाळ- रात्र ही झाली तरीसुधा मुलगी घरी आली नाही. सर्वत्र शोध केले तरी पण मुलीचा पत्ता लागलेला नाही, मुलीचा पत्ता न लागल्याने आई-वडील हे धानोरा पोलीस स्टेशनला याविषयी माहिती देण्यासाठी गेले, पोलिसांनी त्याचवेळी सदर तक्रार नोंद करून पोलिसांनी रात्रभर शोधा शोध केला. अखेर पोलिसाच्या संशयावरून पन्नास वर्षे हुन अधिक असलेल्या कपड्या विक्रेत्याने त्या मुलीला पळवून नेल्याचे समजून आले. कपडे विक्रेते हे दोन ते तीन महिन्यापासून अनंत साळवे यांच्या चाळीत किरायाने राहात असल्याचेही पोलीस विभागाकडून माहिती प्राप्त झालेली आहे. तर यापूर्वी या ठिकाणी तीन व्यक्ती राहत होते मात्र दोन व्यक्ती हे काही दिवसापूर्वीच आपल्या गावाकडे निघून गेले हे सर्व उत्तर प्रदेशातीलच रहिवासी असल्याचे समजत आहे.

मुसाफिर यांची मुसाफिर नोंद कुठेच नाही
धानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी बाहेर राज्यातून उन्हाळ्यामध्ये अनेक व्यवसायिक काही महिन्यासाठी वास्तव्यात असतात. या ठिकाणी सर्व व्यावसायिक हे भाडेतत्त्वावरच किरायाच्या रूममध्ये राहत असतात. रूम मालक हे आधार कार्ड इतर विचारपूस करूनच किरायदार ठेवणे अनिवार्य आहे, किरायदार हे आपण इतक्या दिवसासाठी आलेलो आहोत अशी नोंद ही पोलीस स्टेशनमध्ये करणे तेवढेच आवश्यकतेची बाब आहे, परंतु हे दोन्ही मुद्दे किरायदार व व्यावसायिक करत नाही, किरायदार फक्त पगडी घेतात व महिन्याचा किराया घेऊन मोकळे होत असतात, परंतु पोलीस स्टेशन, घरमालक यांच्याकडे कुठलाच याविषयी ठोस पुरावा वास्तव्याचा नसतो, धानोरा तालुक्याचे ठिकाण असल्याने शंभरहून अधिक या ठिकाणी व्यावसायिक आहेत मात्र याची एकाची नोंद या ठिकाणी मुसाफिर म्हणून पोलीस स्टेशनला केलेली नाही. जर अशा घटना घडल्या तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
पोलीस विभाग चंद्रपूर कडे रवाना
सदर मुलगी व कपडे विक्रेता सुद्धा अचानक गायब असल्याने पोलिसांनी रात्र पासून चक्र फिरवले. पोलिसांच्या गुप्त माहितीनुसार चंद्रपुरात काल २७ मे रोजी हे दोघेही दिसल्याचे माहिती मिळाली. माहिती मिळताच धानोरा पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी चंद्रपूर कडे रवाना झालेले आहेत. वृत्त लिहेपर्यंत कुठला स्थान पत्ता लागलेला नाही. अधिक तपास धानोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस स्टेशन धानोरा करीत आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora )