धानोरा : वाघाने पाडला बैलाचा फडशा

1175

– रांगी परिसरात वाघाची दहशत
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १६ सप्टेंबर : तालुक्यातील रांगी येथे शुक्रवार १५ सप्टेंबर शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्यात बैल ठार केल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
नियतक्षेत्रातील उत्तर रांगी कक्ष क्रमांक ४४१ परिसराला लागून असलेल्या शेतशिवारात गणपत नागोजी कुमरे यांचे बैल चरत असताना अचानक वाघाने बैलावर हल्ला केला. या हल्यात बैल ठार झाले. यामुळे पोळ्याच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. शेतकामा करिता बैलांची नितांत गरज असते. बैला शिवाय कोणतेही काम करणे शक्य नाही. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे एस. आर.रामगुंडावर क्षेत्र सहाय्यक रांगी, कु. टी.व्ही. कुमरे, वनरक्षक, एम. एन. कोहडे वनरक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मौका पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. वाघ मोठा असून तो वयस्कर असल्याचे कळते त्यामुळे जगल परिसरात कोणत्याही व्यक्तीने एकटे भटकु नये असे आवाहन वनविभागाने जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here